वेड : रितेशच्या वेड चित्रपटाची तुफान कमाई. आतापर्यंत 55 कोटीचा टप्पा पार.

प्रेक्षकांचा प्रतिसाद पासून नवीन सिन्स शूट करून चित्रपट टाकले...

updated:2023-01-24 11:34:38

...

वेड : मराठी सिनेमा, मराठी कलाकार आणि तरीही 50 कोटी पार. होय रितेश रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असलेला वेड चित्रपट सुपरहिट झाला. आतापर्यंत 55 कोटीपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे. रितेश देशमुख आणि जीनिलीया देशमुख वेगवेगळ्या सिनेमागृहात भेट देऊन प्रेक्षकांना सुखद धक्का देत आहेत. 

वेड चित्रपटाची निर्माती जीनिलीया देशमुख आहे. चित्रपट तयार करताना संपूर्ण गुंतवणूक जवळपास 15 कोटी इतकी होती. यात अजय अतुल या जोडीने अगदी मनमोहक अशी गाणी दिली आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले कि अजून अशाच प्रकारची 20 गाणी तयार आहेत. त्यातून हि काही निवडक गाणी चित्रपटात समाविष्ट केली गेली.

चित्रपटातील गाणी 

  1. वेड लावलाय 
  2. वेड तुझं 
  3. सुख कळले 
  4. बेसुरी 

हे पण पाहा >>MPSC 2023 : MPSC मार्फत गट ब आणि गट क संवर्गातील 8169 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

रितेश देशमुखने मुख्य भूमिका म्हणजेच सत्या नावाची भूमिका केली आहे तर जीनिलीया देशमुख यांनी श्रावणी नावाची भूमिका केली आहे. यामध्ये अशोक सराफ, जिया शंकर हे सुद्धा मुख्य भूमिकेत आपल्याला दिसतील.

प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून रितेश आणि जीनिलीया देशमुखने चक्क नवीन शूट करून चित्रपटात काही नवीन सिन्स टाकले.  त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद दिसला. 

चार आठवड्यातील चित्रपटाची कमाई 

  • पहिला आठवडा - 20.67 कोटी 
  • दुसरा आठवडा - 20.18 कोटी 
  • तिसरा आठवडा - 9.95 कोटी 
  • चौथा आठवडा - 5 कोटी 

सैराट नंतर एवढी मोठी कमाई करणारा वेड हा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. या आधी सैराट या चित्रपटाने 100 कोटीचा टप्पा पार केला होता. 

हे पण पाहा >> शेअर मार्केट शिका आता मराठीमध्ये 

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: