शेअर मार्केट समजून घेऊयात...
updated:2023-01-20 12:51:36
Market Guru : मागील वेळेस आपण कोणकोणते चार्ट असतात आणि technical analysis व Fundhamental analysis याबद्दल माहिती पहिली. आज आपण Technical analysis मध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात ते पाहू.
हे पण पाहा >> MarketGuru : Technical Analysis, Fundamental analysis आणि charts
यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे ते म्हणजे एक कॉम्पुटर किंवा laptop. यामध्ये आपण शेअर्सचे जे चार्ट आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. सर्वात जास्त प्रमाणात वापरला जाणार चार्ट म्हणजे Candlestick Chart. यामध्ये लाल व हिरव्या रंगाच्या candle आपल्याला दिसतात. Technical analysis करताना Price action, Support आणि Resistance या महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात.
Price action म्हणजे काय? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडतो. तर Price action म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत होणारे बदल. आपल्याला फक्त त्यावर लक्ष ठेवून काम करायचे आहे.
उदा. 1 - एका कंपनीची किंमत आता 50 रुपये आहे. ती एका कालावधीत 40 रुपये इतकी झाली. पुन्हा काही कालावधीत ती किंमत 45 रुपयांनी वाढली. त्यानंतर 42 रुपये झाली व नंतर 55 रुपयांपर्यंत गेली.
उदा. 2 - याउलट एका कंपनीची किंमत आता 40 रुपये आहे. ती एका कालावधीत 50 रुपये इतकी झाली. पुन्हा काही कालावधीत ती किंमत 45 रुपयांपर्यंत कमी झाली. त्यानंतर 48 रुपये झाली व नंतर 35 रुपयांपर्यंत कमी होत गेली.
हा जो काही शेअर्सच्या किमतीचा चढ उतार आहे याला price action असे म्हणतात. याचा उपयोग करून शेअर्स विकत घेण्यासाठी Support आणि Resistance या दोन संकल्पना येतात.
उदा. 1 मध्ये जेव्हा शेअर्स ची किंमत 50 रुपयावरून कमी होऊन 40 रुपयांवर येते व 45 रुपयांपर्यंत वाढू लागते पुन्हा 42 वर येऊन 55 रुपयांपर्यंत किंमत वाढते. या सगळ्यात 40 ते 42 रुपयांच्या पेक्षा शेअर्स ची किंमत कमी होत नाही तर त्या किमती पासून किंमत अजून मोठ्या प्रमाणात वाढू लागते व 55 रुपयांपर्यंत वाढत जाते. या लेवल ला Support असे म्हणतात. यास Demand zone असेही म्हणतात.
हे पण पाहा >> MarketGuru: शेअर्स Buy आणि Sell करणे. म्हणजे काय?
तसेच उदा.2 मध्ये 50 रुपयांपासून किंमत न वाढता 35 रुपयांपर्यंत कमी होते. या लेवल ला resistace असे म्हणतात. यास Supply zone असेही म्हणतात.
Support level पासून आपण अगोदर शेअर्स विकत घेऊन नंतर विकून फायदा कमवू शकतो तर Resistance level पासून आपण अगोदर शेअर्स विकून नंतर तेच शेअर्स विकत घेऊन फायदा कमवू शकतो.
वरील फोटोत या दोन्ही level दाखवल्या आहेत. support level 400.75 रुपये आहे तेथून 404.75 इतकी किंमत वाढली आहे व तिथे resistance level 404.50 रुपये असल्यामुळे पुन्हा तेथून किंमत कमी होण्यास सुरवात झाली आहे.
लवकरात लवकर अपडेटसाठी
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: