लहान मुलांसाठी आनंददायी विज्ञान खेळणी

दैनंदिन जीवनातील विज्ञान हा संकल्पना देखील माहीत नसलेल्या त्या काळात वैज्ञानिक खेळणी बाजारात मिळतात.

updated:2023-01-20 06:17:40

...

दैनंदिन जीवनातील विज्ञान हा संकल्पना देखील माहीत नसलेल्या त्या काळात वैज्ञानिक खेळणी बाजारात मिळतात, यावर कोणाचा विश्वासही बसला नसता. अलिकडे सतत नाविन्याच्या शोधात असलेले विद्यार्थी आणि मुलांच्या बौद्धिक विकासाबाबत जागरुक असलेल्या पालकांनी विज्ञान खेळण्यांत आणलं आहे. त्यामुळे करमणूक म्हणून वापरल्या जाणाऱ्या खेळण्यांची जागा आता सायंटिफिक आणि वेगवेगळे गुण विकसित करणाऱ्या खेळण्यांनी घेतली आहे. विज्ञान हा विषय पुस्तकात शिकण्यासाठी आणि भविष्यात शास्त्रज्ञ, संशोधक होण्यास इच्छुक असलेल्या मुलांसाठीच आहे, अशी ढोबळ समजूत काही वर्षांपूर्वीपर्यंत पालक आणि मुलांमध्ये पाहायला मिळत होती. आजही ती खेळणी आहेत, मात्र त्यांची क्रेझ कमी होत असून त्या जागी आता फ्लाइंग टॉइज, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, बिगिनर्स बायलॉजी, स्ट्राँग स्ट्रक्चर्स, पंप्स फॉर आणि डडू इट युवर सेल्फवर आधारित विविध खेळणी जमा होत आहेत. छोट्या मुलांसाठी मिनी केमिस्ट्री लॅबचे सेटही उलब्ध झाले आहेत. पालकांबरोबरच लहान मुलांमध्येही या वैज्ञानिक खेळण्यांविषयी क्रेझ वाढते आहे. विशेष म्हणजे एरवी शाळेत वर्षातून एकदा दिसणारा मोठा टेलिस्कोपही अलिकडे मुलांच्या गॅलरीत पाहायला मिळतो आहे. काही पालक मुलांबद्दल चिकित्सक असल्यानं मुलांच्या बुद्धीला चालना देतील अशी खेळण्यांची मागणी आवर्जून करतात. टाय विथ ए परपझ असं आम्ही या खेळण्यांना नाव दिलं आहे. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिक आणि जीवशास्त्रावर आधारित खेळण्यांचा समावेश असून पाठ्यपुस्तकातील अनेक अवघड संकल्पना यातून सहजसोप्या पद्धतीनं मुलांना अवगत होत आहेत. डू इट युवरसेल्फ हा खेळण्याचा प्रकार तर मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठीच तयार करण्यात आला आहे. वैज्ञानिक खेळण्यांमध्ये भारतीय उत्पादनांची संख्या अधिक आहेत. विशेष म्हणजे ही खेळणी सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत उपलब्ध आहेत. विज्ञान हा पुस्तकातून शिकण्यापेक्षा प्रयोगातून शिकण्याचा विषय आहे. विज्ञान जर सहज सोप्या खेळांच्या माध्यमातून शिकवलं, तर ते मुलांना आवडतं, कुतूहल जागवतं आणि संकल्पनाही त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी टाकाऊ गोष्टींतून खेळणी बनविण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला आणि हा प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी झाला. सुरुवातीला काही मोजक्याच शाळांमध्ये सुरुवात करून पुढे तब्बल सोळा हजार सरकारी शाळांतून हा प्रकल्प राबविला गेला.

लवकरात लवकर आपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830

Popular

Technology: