मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी वैयक्तिक लाभाच्या चार योजना ‘शरद पवार ग्रामसमृद्धी‘ योजनेंतर्गत राबविण्यात येणार आहेत.
updated:2023-01-18 11:12:41
मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी वैयक्तिक लाभाच्या चार योजना ‘शरद पवार ग्रामसमृद्धी‘ योजनेंतर्गत राबविण्यात येणार आहेत.
1)गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे.
2)शेळीपालन शेड बांधणे.
3)कुकुटपालन शेड बांधणे.
4)भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये वैयक्तिक लाभाच्या ४ वेगवेगळ्या योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश्य:
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या
योजना लाभ आणि पात्रतेच्या अटी
योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येताहेत.
१)गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:-
जनावरांसाठीच्या गोठ्यात चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल. योजनेच्या लाभासाठीची पूर्वीची 6 गुरांची अट तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान देय राहील.
२)शेळीपालन शेड बांधणे:-
2 शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. एका शेडसाठी 49 हजार 284 रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरिता 3 पट अनुदान मंजुर करण्यात येईल.
३)कुक्कुटपालन शेड बांधणे:-
कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये अनुदान दिले जात आहे. 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थीनी पक्षांची संख्या 150 च्यावर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल. एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करायची आहे.
४)भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग:-
शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रीय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरिता शेतात एक नाडे बांधण्यासाठी ही योजना आहे.
या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. 2 ते 3 महिन्यात काळपट तपकीरी भुसभुसीत, मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार 537 रुपये अनुदान देण्यात येणार आहेत.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: