भोगी - मकर संक्रांतीला "पौष्टिक तृणधान्य दिन" साजरा करण्याचे आवाहन

2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करणारा ठराव संमत केला आहे.

updated:2023-01-15 02:19:39

...

जागतिक कृषी खाद्य प्रणालींना सातत्याने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येला अन्न पुरवण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तृणधान्य हा एक परवडणारा आणि पौष्टिक पर्याय आहे. 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करणारा ठराव संमत केला आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणधान्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, कृषी मंत्रालयानं आज संसदेत सदस्यांसाठी तृणधान्य खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने कृषि विभागामार्फत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांत-भोगी हा दिवस राज्यामध्ये "पौष्टिक तृणधान्य दिन" म्हणून साजरा करावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर तृणधान्य उत्पादनाचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आकाशवाणीला सांगितलं.तृणधान्य उत्पादन वाढीसाठी तसंच 2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी याचा उपयोग होईल असं कृषीमंत्री म्हणाले. याचा फायदा तृणधान्य उत्पादन वाढीसाठी तसंच 2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी होईल असं कृषीमंत्री म्हणाले.
पौष्टिक तृणधान्य दिनाच्या औचित्यावर गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्रांचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती आणि लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे देखील कृषि विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Popular

Technology: