महाराष्ट्र केसरी : 2023 च्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पै. शिवराज राक्षेने पटकावला किताब

खेडच्या पैलवानानं सोलापूरच्या पैलवानाला चीतपट करत जिंकला किताब...

updated:2023-01-14 14:44:07

...

महाराष्ट्र केसरी :  काही दिवसांपूर्वी हिंदकेसरी ही स्पर्धा पार पडली. त्यात पुण्याच्या पैलवान अभिजित कटकेने हिंदकेसरी हा किताब पटकावला. त्याने हरियाणाच्या पैलवानाला चीतपट करत हिंकेसरी हा किताब पटकावला. 

पुणे येथे सुरु असलेल्या स्पर्धेतून आज 2023 चा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला मिळाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मा. चंद्रकात दादा पाटील, क्रीडामंत्री गिरिज महाजन हे उपस्थित होते. यासाठी 

दोन्ही सेमीफायनल अगदी चुरचीच्या झाल्या. त्यातून विजेते ठरलेले पैलवान अंतिम सामन्यात आले.

हे पाहा  टेनिस बॉल-क्रिकेट ते आयपीएल. नवीन आरसीबी वेगवान गोलंदाज अविनाश सिंगची कहाणी

महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना लाल मातीचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध मॅट वरचा पैलवान शिवराज राक्षे झाला. 

अतिशय अतीतटीच्या अश्या सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याने बाजी मारली. पै. महेंद्र गायकवाड याला चीतपट करत महाराष्ट्र केसरी किताब त्याने पटकावला. अंतिम सामन्यावेळी अगदी भरगच्च आशी गर्दी होती. यावेळी देवेंद्र फडणविसांनी खेळाडूंच्या मानधनात 3 पटीपेक्षा जास्त प्रमाणात वाढ करण्याचे जाहीर केले. तसेच खेळाडूना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच आश्वासन दिले. 

स्पर्धेदरम्यान अगदी भव्यदिव्य असे नियोजन करण्यात आले होते. याबाबत सर्व श्रेय मुराली अण्णा मोहोळ यांना जाते. 

या स्पर्धेसाठी चांदीची गदा, थार गाडी, मोटर सायकल अशी विविध बक्षिसे कुस्तीगीरांना देण्यात आले.

लवकरात लवकर उपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830

Popular

Technology: