महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविमच्या माध्यमातून राज्यात नव तेजस्विनी योजना राबवली जाणार आहे.
updated:2023-01-14 11:44:52
महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविमच्या माध्यमातून राज्यात नव तेजस्विनी योजना राबवली जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला बचत गटांना 523 कोटी रुपयांचा निधी द्यायला राज्य मंत्रिमंडळाने ऑक्टोबरमध्येच मंजूरी दिली आहे.
काय आहे योजना?
योजने अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगार मिळणार असून ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या निर्णयामुळे मदत होणार आहे. या योजनेमुळे तब्बल 10 लाख कुटुंब दारिद्र्य रेषेतुन बाहेर येतील, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल अँप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने थेट खरेदी करु शकतात.
योजनेच्या माध्यमातून महिलांना छोटे व्यवसाय आणि गृह उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ग्रामीण भागातील महिलांना उत्कर्षाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावणे हे या योजनेचा मुख्य हेतू आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: