MarketGuru : Technical Analysis, Fundamental analysis आणि charts

मार्केट समजून घेण्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या?

updated:2023-01-13 07:52:12

...

मागील वेळेस आपण शेअर्स आधी विकत घ्यायचे व किंमत वाढली कि विकायचे नाहीतर शेअर्स आधी विकायचे आणि किंमत कमी झाली कि विकत घ्यायचे. त्यातून फायदा कसा होतो हे पाहिले. 

आता शेअर्स विकत घेताना कोणत्या गोष्टी पहायच्या, कशाची आवश्यकता आहे याची आपण माहिती घेऊयात. यात तुम्ही Technical Analysis किंवा Fundamental analysis चा वापर करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला chart म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. चारत म्हणजेच शेअर्सच्या किमती जश्या बदलत राहतात त्या आलेखाच्या मार्फत दाखवल्या जातात. हे चार्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लाईन चार्ट (line chart), कॅण्डल स्टिक चार्ट (candlestick chart), बार चार्ट (bar Chart), फिगर चार्ट (figure chart) इत्यादी. 

या चार्ट वरून तुम्ही शेअर्स ची किंमत किती प्रमाणात कमी जास्त झाली हे पाहू शकता. यात तुम्हाला 1 मिनिटापासून ते 1 महिना, 1 वर्ष तर 5 वर्षे अश्या वेगवेगळ्या काळात किंमत काय होती आणि आता किती आहे हे कळते. तर चालू किंमत काय आहे हे सुद्धा कळते. 

 Technical Analysis मध्ये चार्ट चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. तुम्ही फक्त वेगवेगळ्या वेळेतील शेअर्सच्या किमती पाहून कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे हे ठरवू शकता. यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की कोणत्या कंपनीच्या शेअर्स च्या किमती वाढणार आहेत. तर कोणत्या कमी होणार आहेत. यामध्ये price action महत्वाची ठरते.

त्याचप्रमाणे तुम्ही कंपनीचा वर्षभरातील गुंतवणूक, घेतलेली कर्जे, बाजारातील मागणी अश्या सर्व प्रकारच्या गोष्टी पासून जे शेअर्स विकत घेता त्याला Fundamental analysis असे म्हणतात. आता यामध्ये भरपूर गोष्टी माहिती करून घेण्यासारख्या आहेत त्या आपण पुढे पाहूच…

Popular

Technology: