महाराष्ट्र: "भाम्बवली वझराई धबधबा"

भाम्बावली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे. उरमोडी नदी ही  या धबधब्याचा उगम स्थान  आहे.

updated:2023-01-12 11:07:02

...

भाम्बावली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे. उरमोडी नदी ही  या धबधब्याचा उगम स्थान  आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. ह्याला तीन पायऱ्या आहेत. तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. प्रसिद्ध कास् पुष्प पठारापासून 5 किमी दूर आणि पुष्प पठारापासून 2 किमी दूर आहे. आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल. या ठिकाणाचे  खरे  आकर्षण निर्मनुष्य शांतता आहे. धबधबा हा बारमाही स्वरुपाचा आहे आणि वर्षातील 12 महिने वाहतो. 
धबधब्याला भेट देताना पर्यटकांनी काळजी घ्यावी.
★सर्प, वाघ,  यासारख्या जंगली प्राण्यापासून व जळू व इतर कीटकापासून  सावध राहा.
★मद्यपान करू नका.
★पोहणेही प्रतिबंधित आहे.
★हे प्लॅस्टिकमुक्त क्षेत्र आहे.
★मुसळधार पावसा असल्यास  या ठिकाणास जाणे टाळा.
★सकाळी 8.00 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत  भेट द्या.
कसे पोहोचाल? 
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक सातारा आहे.
रस्त्याने
सातारा येथून भाम्बावली- 32 किमी दूर आहे. 
१) सातारा-कास -कासपासून तांबी (भांबवली) पर्यंत जावे लागते. किंवा 
(2) महाबलेश्वर ते तापोळा ते बामणोली-कास, कास ते तांबी (भांबवली).

Popular

Technology: