Technology: सोशल मिडियावर लोकांना भुरळ पडणारी लिया (Lia) आहे तरी कोण?

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर फेमस असणारी लिया आहे Artificial intelligence.

updated:2023-01-11 09:06:08

...

Technology : इंटरनेटच्या जगात सगळेच सोशल मिडियाचा वापर करत आहे. तरुण पिढीतीलसर्वच जण फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामचा वापर करतात. आज जर पाहिले तर वेगवेगळ्या क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रोमोशन करण्यासाठी म्हणजेच जाहिराती साठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आज एखाद्या कंपनीची वस्तू जर विकायची असेल, तिची जाहिरात करून त्याची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर खूप मोठी रक्कम देऊन वेगवेगळ्या मॉडेलकडून त्याची जाहिरात करावी लागते. मग यासाठी जाहिरात करणाऱ्या कंपनीला पैसे द्यावे लागतात. जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीकडून त्यांच्या सोशल मिडियावरून जाहिरात प्रसिद्ध करायला सांगितली तरी पैसे मोजावे लागतात. 

या सर्वाला उत्तर देत तुमचा खर्च भागविण्याच्या दृष्टीने LIA27INC या Artificial intelligence कंपनीने virtual म्हणजेच सुंदर दिसणारी आभासी मॉडेल तयार केली आहे. Lia 27 या नावाने फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर तिची खाती आहेत. त्यावर खूप मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स पण आहेत. भविष्यात सोशल मिडियावर कमी पैशात जाहिरातीसाठी नक्कीच Artificial intelligence चा वापर होईल यात शंका नाहीच.

लिया या Artificial intelligence मॉडेलच वय 27 वर्षे आहे. एंजेलिक इओ डी परफम यांचा चेहरा लियाला देण्यात आला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ती काही प्रमाणत स्वतः विचार करू शकते. अर्थातच ते command वर ठरलेले असेल. Lia 27  brain version 1.0: January 27th 2021 व Lia 27 brain version 2.0: November 18th 2022 असे दोन प्रकारचे व्हर्जन आतापर्यंत आले आहेत.

लवकरात लवकर उपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830 

Popular

Technology: