शेती: निसर्गावर आधारित व्यवसाय

शेतीला पूरक व आर्थिक उत्पन्नात भर टाकणारे व्यवसाय सुरू केले पाहिजेत. त्या व्यवसायांचा फायदा आपल्या जीवनात करून घेतला पाहिजे.

updated:2023-01-11 01:55:08

...

शेतीला पूरक व आर्थिक उत्पन्नात भर टाकणारे व्यवसाय सुरू केले पाहिजेत. त्या व्यवसायांचा फायदा आपल्या जीवनात करून घेतला पाहिजे.

दुग्ध व्यवसाय::
दुग्ध व्यवसाय करून दूध मिळवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्रोत शेतकऱ्यांचा बळकट करतो. दुधापासून मिळणारे ताजे प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत. दुधाचा रतीब सुद्धा तयार करतो करू शकतो. दूध हे उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा फायदेशीर व्यवसाय आहे. 
गांडूळ खत:
सेंद्रिय खताचा पुरवठा वाढल्यामुळे गांडूळखतामध्ये असणारा नत्र स्फुरद पालाश यांचा अन्नद्रव्य शेतीला उपलब्ध होत असल्यामुळे शेत जमिनी मधील जिवाणूंची संख्या वाढून जमिनीचा पोत सुधारला जाईन आणि जमीन भुसभुशीत होईल आणि सेंद्रिय खतामुळे कीडनाशक प्रक्रिया होणार नाही आणि आपल्याला पीक जोमदार आणि उत्पादन योग्य रीतीने भेटत राहील.
औषधी वनस्पती:
शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतींची लागवड करून उत्पादन घेता येते. औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा औषधी वनस्पती आहेत. आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्यामुळे त्यापासून औषधी गुणधर्म तयार करून विकु शकतो.
शेळी पालन:
शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि उत्तम व्यवसाय आहे. शेळी पासून मिळणारे लेंडी खत व शेळीपालन मिळणारे दूध आणि त्यापासून मिळणारे उत्पादन शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
कुक्कटपालन:
शेतकऱ्यांसाठी एक पूरक व्यवसाय यांनी आर्थिक उत्पन्न देणारा स्रोत्र कुकूटपालन आहे. त्यामुळे शेतीशी निगडित कुकुट पालन पोल्ट्री व्यवसाय करणे खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. कोंबडी पासून मिळणारी अंडी हेसुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक नफा देणारा आणि शेतीला पूरक असा व्यवसाय ठरतोय.
मत्स्य पालन:
शेत तळ्यामध्ये पालन हा व्यवसाय केला जातो. मत्स्य पालन करून त्यामध्ये माशांचे उत्पादन घेतले जाते. त्यापासून खत व मेडिसिन निर्मिती केली जाते.
शेती क्षेत्राच्या निगडित असणारे व्यवसाय पुढीलप्रमाणे :--
कुक्कुटपालन
शेळी पालन
दुग्ध व्यवसाय
मशरुम शेती
रेशिम शेती
मधमाशी पालन
मत्स्य पालन
कृषी पर्यटन उद्योग
चारा निर्मिती
वैरण, बियाणे उत्पादन, संकलन व वितरण
पशुखाद्य निर्मिती
गांडूळ खत
अळिंबी उत्पादन
शेतमालापासून विविध पदार्थ
औषधी वनस्पती लागवड
फळ प्रक्रिया उद्योग
मोती निर्मिती
भरपूर असे शेती निगडित व्यवसाय आहेत त्यापैकी वरील काही महत्त्वाचे व्यवसाय आहेत. शेती बरोबर आपण पूरक असे व्यवसाय करू शकतो त्यामुळे आपल्या उत्पन्न वाढेल त्यामुळे पूरक व्यवसाय शेतकऱ्यांनासाठी फायद्याचे ठरू शकेल.

Popular

Technology: