आपण निरोगी अणि आनंदी आयुष्य जगतो आहे ते आपल्या आजुबाजुच्या स्वच्छ अणि निरोगी वातावरणामुळे,पर्यावरणामुळेच जगतो आहे.
updated:2023-01-10 07:57:04
आपण निरोगी अणि आनंदी आयुष्य जगतो आहे ते आपल्या आजुबाजुच्या स्वच्छ अणि निरोगी वातावरणामुळे,पर्यावरणामुळेच जगतो आहे.
◆जास्तीत जास्त झाडे लावा
एक झाड आपल्याला दरवर्षी तीस ते चाळीस लाखांचा आँक्सिजन पुरवत असते. झाडे लावा झाडे जगवा. कारण ह्याच झाडांमुळे आपल्याला आँक्सिजन प्राप्त होत असतो.
त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे आपण लावायला हवीत.
◆पाण्याची बचत
पाण्याशिवाय आपण अजिबात जगु शकत नाही. आपल्या आजुबाजुची पर्यावरणाला पोषक झाडे यांना सुदधा पाण्याची आवश्यकता असते. म्हणून जल हेच जीवण आहे.
◆वीजेची बचत
ऊर्जेचा एक अंश हे आपण निर्माण केलेल्या ऊर्जेच्या दोन अंश इतका असतो. म्हणुन ऊर्जेची बचत करणे फार गरजेचे आहे. जळाऊ लाकडांचा वापर कार्यक्षमतेने केला तर नक्कीच आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल.
◆इंधनाची बचत
कोळसा,डिझेल,पेट्रोल ही सर्व जी आहेत घनरुप इंधने आहेत. इंधन हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे उष्णता निर्माण होत. त्यामुळे इंधनाची बचत करावी लागते.
◆कागदाचा कमी वापर
आपण जर अवाजवी कागदाचा वापर केला तर जेवढा अपव्यय आपण कागदाचा करु तेवढेच एक झाड आपण संपवले. म्हणून आपण नेहमी कमीत कमी कागदाचा वापर करायला हवा.
◆प्लँस्टिक वापर टाळा
पुन्हा वापरण्यायोग्य किराणा बॅग खरेदी कराव्यात. कापडी बॅग वापराव्यात. पिण्यायोग्य नळाद्वारे पाणी उपलब्ध होत असेल तर आपण प्लॅस्टिक बाँटल घेणे टाळायलाच हवे.
◆घरगुती खत बनवावे
आपल्या बागेत उत्तम कंपोस्टिंग -खत तयार करू शकता , घरात उरलेलं अन्न , केर कचरा तसेच पाला पाचोळा व बनवून ऑरगनिक मोहिमेला चालना देवू शकता, केमिकल फ्री जैविक खत , औषधी वापरुन जैविविधेत भर घालू शकता.
◆ पारंपरिक साधनांचा वापर
सौरऊर्जा असा एक स्त्रोत आहे की कधी न संपणार ऊर्जा आहे. ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तिचा जास्तीत जास्त वापर करणे.
पवनऊर्जा सुध्दा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते तिचा पुरेपूर वापर केला पाहिजे
समुद्राच्या लाटांपासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते.
आशा प्रकारे आपण पर्यावरणाचा संरक्षण करू शकतो ती काळाची गरज आहे. जर नाही केल तर पुढे भविष्यात मानवी जीवन धोक्यात येऊ शकते त्यामुळे आतच खबरदारी घेतली पाहिजे अन पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: