वाढलेली स्पर्धा, सुपरफास्ट जीवनशैली, नको इतक्या उंचावलेल्या अपेक्षा, कॉलसेंटरसारख्या रात्रभर चालणाऱ्या नोकऱ्या - यामुळे निवांतपणा किंवा आराम करायला वेळ नसतो. त्यामुळे अनेक जण मानसिक ताणाखाली जगत असतात.
updated:2023-01-08 16:41:02
जीवनशैली आपला वेगाने ताबा घेत आहे. काळजीची बाब म्हणजे तरुण पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन वृद्धापकाळात होणारे आजार हल्ली तारुण्यातच गाठू लागले आहेत. जागतिकीकरणामुळे संधी वाढल्याने करिअरच्या संकल्पना बदलत आहेत. पगाराचे आकडेही वाढत आहेत. हे आकडे जेवढे मोठे तेवढाच कामाचा ताण अधिक हे नव्याने सांगायला नको. कामाच्या पद्धती व खाण्याच्या सवयींत बदल होत आहेत. स्पर्धा व सतत कामाचा ताण. पैसे खर्च करण्याची क्षमता व वस्तूंची सहज उपलब्धता. यामुळे आहार आणि व्यायामाच्या सवयी बदलत चालल्या आहेत. छंद जोपासण्यासाठी किंवा इतर काही करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच उरत नाही. सततच्या तणावामुळे भुकेचे प्रमाण वाढते. याला स्ट्रेस इटिंग असेही म्हणतात. तणावामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाचे संप्रेरक पाझरते. त्यामुळे भूक वाढते. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. नोकरी करणारे असल्याने वेळेअभावी सतत बाहेरचे अन्न खावे लागते. योग्य आहाराअभावी जीवनसत्त्व व खनिजांच्या गोळ्या सुरू होतात. खासगी वा सरकारी कुठल्या ना कुठल्या वाहनात बसूनच वा उभं राहून कामाच्या ठिकाणी जाणं-येणं केलं जातं. त्यामुळे चालण्याचा व्यायामपण बंद झालाय. साहजिकच या बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शहरी आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. जाता येता जंकफूड खात राहण्यामुळे व दैनंदिन जीवनात शारीरिक कामांचा व व्यायामाचा अभाव यामुळे स्थूलपणा येऊ लागतो. मुलांना खेळायला क्रीडांगण, मैदान, मोकळ्या जागा नाहीत. शिकणारी मुलं बाहेर शाळा, कॉलेज, ट्युशन यामध्ये व्यस्त व घरी लॅपटॉप, मोबाइल, टीव्हीच्या मस्तीत दंग. अनेक जणांना मधुमेह होतोय, याचं कारण आहे व्यायामाचा अभाव, अति प्रमाणात साखरयुक्त व स्निग्ध पदार्थांचं सेवन आणि वाढलेले ताणतणाव! वाढलेली स्पर्धा, सुपरफास्ट जीवनशैली, नको इतक्या उंचावलेल्या अपेक्षा, कॉलसेंटरसारख्या रात्रभर चालणाऱ्या नोकऱ्यामुळे निवांतपणा किंवा आराम करायला वेळ नसतो. त्यामुळे अनेक जण मानसिक ताणाखाली जगत असतात. पिझ्झा, पाव, चायनीज पदार्थ यासारखे मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पचनकार्य मंदावत जात, अपचनाचा त्रास होतो. अति तळलेले व अति तिखट पदार्थ खाल्ल्याने, तसेच वेळी-अवेळी जेवल्याने, घाईघाईने नीट न चावता खाल्ल्यामुळे किंवा रात्री घरी आल्यानंतर भरपूर जेवण करून लगेच झोपल्याने असिडिटीचा त्रास होऊ शकतो. तुम्ही किती आनंदी आहात याचा संबंध तुमच्याकडे किती पैसे आहे त्याच्याशी लावता कामा नये. आयुष्यात जितक्या कमी वस्तू असतील तितक्यात जास्त एकाग्रपणे आपण काम करू शकतो म्हणजेच कमीत कमी वस्तूंमधून जास्तीत जास्त आनंद, वेळ आणि समाधान मिळवता येते. मिनिमलिझम जीवनशैली जोपर्यंत विचारसरणी म्हणून अमलात येत नाही तोपर्यंत मोहा मध्ये वाढ होऊ शकते
Popular
Sports:
Technology:
Job Alert: