"स्वच्छता आणि आरोग्य महत्त्व"

वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे. आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

updated:2023-01-08 12:27:46

...

घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे. परिसर स्वच्छतेचे महत्त्व हे जाणून घेणे गरजेचे आहे.
परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. परिसर स्वच्छतेमध्ये खालील गोष्टी येतात शुद्ध हवा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, मानवी म्ल्मुत्रांची विल्हेवाट, पाळीव प्राण्यांची देखभाल, घरातील स्वच्छता, शेण व कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाण्याची विल्हेवाट. या सर्व गोष्टींचा समावेश करता येईल पण या सर्व गोष्टीची विल्हेवाट कशी करवी यावर विचार करणे आवश्यक आहे. पाणी एखाद्या सुर‍क्षित स्‍त्रोतापासूच घ्‍यावे किंवा शुध्‍द केलेले पाणी वापरावे.   पाणी स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी पाण्‍याच्‍या भांड्यांना झाकून ठेवावे हे आवश्‍यक आहे. खाद्यपदार्थ, भांडी आणि स्‍वयंपाकाची भांडी ठेवण्‍याच्‍या जागा नेहमी स्‍व्‍च्‍छ ठेवाव्‍यात. खाद्यपदार्थ नेहमी झाकून ठेवावे. घरातील सर्व कचरयाची सुरक्षित विल्‍हेवाट लावायला हवी कारण यांमुळे रोगांपासून बचाव होतो. साबण आणि पाण्‍याने रोज चेहरा धुतल्‍याने डोळ्यांच्‍या संसर्गापासून बचाव होतो.  शकते. सर्व प्रकारच्‍या घरगुती घाणीची सुरक्षितरीत्‍या विल्‍हेवाट लावल्‍याने रोगांपासून बचाव होतो. रोगजंतुंचा प्रसार थांबविण्‍यासाठी सर्वात उत्तम एकमात्र उपाय आहे सर्व मलाची—मानव किंवा पशुंचा – सुरक्षित विल्‍हेवाट लावावी. मानव मल शौचकूप किंवा शौचालयात टाकून द्यावा. संडास नेहमी स्‍वच्‍छ ठेवावे. पशुंचा मल घर, रस्‍ते आणि मुलांच्‍या खेळायच्‍या जागेपासून खूप दूर ठेवायला हवा. जर शौचकूप किंवा संडासाचा उपयोग करणे शक्‍य नसेल तर, सर्वांनीच घर, रस्‍ते, पाण्‍याचे  स्‍त्रोत आणि मुलांच्‍या खेळायच्‍या जागेपासून खूप दूर जाऊन मलत्‍याग करावा आणि मल ताबडतोब पुरून टाकावा. लॅट्रिन आणि संडास नेहमी स्‍वच्‍छ ठेवावेत. लॅट्रिन झाकून ठेवावी आणि शौचकूपांमध्‍ये  फ्लश चालवायला हवा. स्‍थानिक सरकार आणि एनजीओ कमी खर्चात सॅनिटरी लॅट्रिन बनविण्‍याचा सल्‍ला देऊन  समुदायांची मदत करू शकतात. हात साबण आणि पाणी किंवा राख आणि पाण्‍याबरोबर चांगल्‍या प्रकारे धुतल्‍याने रोगजंतु निघून जातात. फक्‍त बोटेच खंगाळून काम चालत नाही तर हात साबण किंवा राखेने धुवायला हवेत. हात धुतल्‍याने कृमिसंसर्ग देखील दूर राहतात. साबण आणि पाणी किंवा राख आणि पाणी शौचालयांच्‍या बाहेर सोयीस्‍करपणे ठेवावे. जर डोळे स्‍वच्‍छ आणि स्‍वस्‍थ आहेत, पांढरा भाग स्‍पष्‍ट आहे, डोळे ओलसर आणि चमकदार आहेत, आणि दृष्टि तीक्ष्‍ण आहे तर तुमचे डोळे स्‍वस्‍थ आहेत आणि जर डोळे खूप जास्‍त कोरडे किंवा लाल आणि सुजलेले असतील, जर एखादा प्रवाह वहात असेल किंवा नीट दिसत नसेल तर ताबडतोब मुलाला आरोग्‍य कर्मचाऱ्यास दाखवा. स्‍वच्‍छ पाण्‍याच्‍या स्‍त्रोतांमध्‍ये चांगल्‍या प्रकारे निर्मित आणि पुरेशा देखरेखीमध्‍ये ठेवलेले पाइप सिस्‍टम, ट्यूबवेल्‍स्, संरक्षित विहिरी आणि ओढे समाविष्‍ट होतात. पाण्‍याचे  असुरक्षित स्‍त्रोत आहेत – तलाव, नद्या, उघड्या टाक्‍या आणि बावडी अशी खूप मोठी विहिर ज्‍यामध्‍ये खाली जाण्‍यासाठी पायऱ्या असतात यांतून घेतलेले पाणी उकळून वापरू शकता. पाणी स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी झाकून ठेवावे. कुटुंबे आणि समुदाय आपल्‍या जलस्‍त्रोतांना या प्रकारे स्‍वच्‍छ ठेवू शकतात. कुठल्‍या ही पाण्‍याच्‍या स्‍त्रोताच्‍या जवळपास कीटकनाशकांचा वापर करू नये. जनावरांना पिण्‍याच्‍या पाण्‍यापासून आणि  कुटुंबाच्‍या राहण्‍याच्‍या जागेपासून दूर ठेवावे. घरांमधून बाहेर निघणारे सांडपाणी आणि मल यांना पाण्‍याच्‍या अशा स्‍त्रोतांपासून दूर ठेवावे जेथून पिण्‍यासाठी, स्‍वयंपाकासाठी, आणि कपडे धुण्‍यासाठी पाणी मिळते. पाण्‍याच्‍या भांड्यात कोणाला ही हात घालू देऊ नका आणि त्‍यातून सरळ पाणी काढू देऊ नका. फळे आणि भाज्‍या जर तान्‍ह्या आणि लहान मुलांना कच्‍च्‍या द्यायच्‍या असतील तर आधी त्‍या स्‍वच्‍छ पाण्‍याने चांगल्‍या प्रकारे धुऊन घ्‍या कीटकनाशक आणि अन्‍य औषधे फळे आणि भाज्‍यांवर दिसून येत नाहीत पण प्राणघातक होऊ  शकतात. कीटकनाशक आणि वनौषधि सारख्‍या रसायनांची  रसायनांचे   काम करतांना वापरलेले कपडे आणि कंटेनरांना घरगुती वापराच्‍या पाण्‍याजवळ धुऊ नये. दात घासण्यासाठी दातांचे मऊ पावडर आणि पेस्ट चांगली असते. दिवसातून दोन वेळा ब्रश करणे आवश्यक असते. आपल्या हातांनी अन्न खाण्याच्या नंतर शैच मलमूत्र नंतर नाक कान स्वच्छ करणे त्यानंतर इतर कामे करणे. त्वचा शरीरातील घाम बाहेर काढून टाकण्यास मदत करते. एखाद्या वेळेस खराब त्वचेमुळे मुरूम तयार होतात त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते. शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत करतात. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळ्या व्हावे तसेच कान सुद्धा स्वच्छ करावेत. आठवड्यातून एकदा तरी कापसाच्या बोळ्याने स्वच्छ पाण्याने कान साफ करावेत. त्यामुळे आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कापडाने स्वच्छ करावे. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शाम्पू किंवा शिकाकाई वापरून आंघोळ करावी. तसेच दोन ते तीन दिवसानंतर डोक्याची तेलाने मॉलिश सुद्धा करा. नदी,नाले,ओढे झरे यांचे पाणी बहुधा खराब असते. पाणी शुद्ध करण्यासाठी खालील उपाय आहेत पाणी भांड्यात काढून साठवून ठेवल्या दिवसभर पाणी स्थिर ठेवल्यास आणि ते वापरल्यास झालेल्या 90% जंतू नष्ट झालेले असतात. तुरटी फिरवून ही क्रिया लवकर होते हे सर्वात स्वस्त व सोपी पद्धत आहे.

Popular

Technology: