शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा मानला जातो. कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या वा बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती व शेतीपूरक व्यवसायावर चालतो
updated:2023-01-08 09:02:45
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. ग्रीन हाऊसमध्ये हवामान नियंत्रित केलेले असते. त्यामुळे त्याच्या बाहेर वातावरण कितीही वाईट असले तरीही या ग्रीन हाऊसमध्ये कधी दुष्काळ पडत नाही. उघडयावर केलेल्या शेतीपेक्षा या ग्रीन हाऊसमध्ये आठपट उत्पन्न जास्त होते.ग्रीन हाऊसचा वापर होत आहे हे तंत्रज्ञानच आहे.काही ठिकाणी पिकांना पाणी देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.पिकांना पाणी देण्याच्या ठिबक सिंचनासारख्या पद्धती तंत्रज्ञानातूनच निर्माण झाल्या आहेत.माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने खूप प्रगती करता येते आणि अशी प्रगती करण्यासाठी या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे.सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मानव जातीला अन्नधान्य पुरवठा करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहे.
●कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांना विविध सवलती
●शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतमाल तारण योजना, ई-नाम योजना
●पशुसंवर्धन, नाबार्ड, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजूर यांचा विकास करणे.
●आधुनिक सिंचनासाठी विविध शासकीय योजना
●शेतकरी, कामगार व उद्योजकता यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कल्याणकारी विशेष कृषि योजना
●शेतीपूरक उद्योग व व्यवसाय करण्यासाठी भागभांडवलाची उपलब्धता
●पीक काढणीनंतर हाताळणी, साठवणूकीसाठी नवनवीन तंत्रज्ञान
●मुख्य पिकाचे काढणीपश्चात्त नवनवीन तंत्रज्ञान
●मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय उत्पादने
●पीक संरक्षणासाठी रासायनिक, जैविक व नैसर्गिक तत्त्वांचा अवलंब
●मुख्य व भाजीपाला पिकांना ठिबक सिंचन पध्दती वरदान
●कमी कालावधीत येणा-या पिकांच्या सुधारित व संकरित जातीचा वापर
●कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन
●सर्वच पिकांचे सखोल व सुलभ भाषेत अत्याधुनिक तंत्रज्ञान
कृषि विद्यापीठे व विविध कृषि संशोधन संस्था यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून, शेतीचे उत्पादन वाढवून, स्वत:चा विकास करून देशाच्या उत्पादनात हातभार लावणे आवश्यक आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: