महाराष्ट्र शासन : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी...

महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरु केली आहे...

updated:2023-01-08 06:53:15

...

महाराष्ट्र : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुशिक्षित तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरु केली आहे. या अंतर्गत 10 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.

या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्ज दिली जातात.

  1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.
  2. गट कर्ज व्याज परतावा योजना.
  3. गट प्रकल्प कर्ज योजना

कर्ज परतफेड करण्याचा कालावधी 5 वर्षे निर्धारित केलेला आहे.

8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास त्या हप्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्त्याच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येते.

पात्रता : 

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  2. अर्जदाराचे वय पुरुष उमेदवारासाठी जास्तीत जास्त 50 वर्षे तर महिलांकारता जास्तीत जास्त 55 वर्षे असावे.
  3. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
  4. बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे.
  5. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या आधिकारीक वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

इत्यादी .

आवश्यक कागदपत्रे :

  1. आधारकार्ड
  2. पॅन कार्ड
  3. रेशन कार्ड पाठपोठ
  4. शाळा सोडल्याचा दाखला
  5. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा) किंवा पती व पत्नी दोघांचे ITR
  6. बँक पासबुक / चेक

अर्जदार https://udyog.mahaswayam.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज साधार करू शकतो.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

दुरध्वनी क्रमांक : 022-226576662 / 022-22658017 

Join Telegram Channel

 

Popular

Technology: