MarketGuru: शेअर्स Buy आणि Sell करणे. म्हणजे काय?

शेअर्स कशाप्रकारे विकायचे किंवा विकत घ्यायचे.

updated:2023-01-08 03:35:06

...

मार्केट गुरु: मागील वेळेस आपण पाहिले कि आपल्याला Demat account ची आवशक्यता आहे. Demat account चालू करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, pan card, आणि bank account ची गरज आहे. एकदा का account चालू केले कि आपण ट्रेडिंग करू शकतो. 

या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशाप्रकारे करायची. BSE आणि NSE मध्ये खूप साऱ्या कंपन्यांनी आपली नोंदणी केलेली आहे. त्यांचा एक भाग म्हणजेच एक शेअर याला विशिष्ट किंमत ठरवलेली असते. हे आपल्याला माहीतच आहे. सर्वप्रथम आपल्याला demat account मध्ये काही रक्कम टाकावी लागेल. कोणत्याही कंपनीचे शेअर्स आपण त्या वेळी असलेल्या किंमतीला एकतर विकत घेऊ शकतो नाहीतर विकू शकतो. ते कसे ? तर पाहूयात.

 उदा. Tata motors या कंपनीच्या एका शेअर ची किंमत 350 रु. आहे. जर तुम्ही या किंमतीला 100 शेअर्स विकत घेण्याचे ठरविले. 

म्हणजेच 350*100= 35000 इतके रुपये तम्ही गुंतविले असा त्याचा अर्थ होतो.

काही दिवसांनी एका शेअर्स ची किंमत 360 रु. इतकी झाली 

म्हणजेच 360*100= 36000 इतकी तम्ही गुंतवलेली रक्कम झाली. याप्रमाने तुम्हाला 1000 रु फायदा झाला.

याउलट जर तीच किंमत 340 रु. झाली तर 340*100=34000 म्हणजेच 1000 रु. तोटा झाला.

हे झाले जर तुम्ही शेअर्स विकत घेणार असाल तर म्हणजेच आधी Buy आणि नंतर Sell करणार असाल  तर…

जर तुम्ही 350 रुपयाचे 100 शेअर्स विकले म्हणजेच 350*100=35000 रुपये गुंतवले. काही दिवसांनी एका शेअर्स ची किंमत 360 रु. झाली म्हणजे 360*100=36000. याप्रमाणे तुम्हाला 1000 रु. तोटा झाला.

याउलट जर तीच किंमत 340 रु. झाली तर 340*100=34000 म्हणजेच 1000 रु. फायदा झाला असे होते. यामध्ये तुम्ही पहिल्यांदा शेअर्स Sell केले व नंतर Buy केले. 

समजण्यासाठी थोडं अवघड आहे. पण एकदा लक्षात आलं कि सोप्प वाटेल. अशाप्रकारे आपण पुढेही आपण खूप काही गोष्टी शिकणार आहोत.

Popular

Technology: