कृषी क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्याला जगात तोड नाही.हे तंत्रज्ञान जगाला विकण्यावर या देशाचा आता भर आहे.
updated:2023-01-06 10:08:15
कृषी क्षेत्रातील प्रगतीबाबत या देशाचे नाव ख्यातकीर्त असले तरी राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पादनांतून मिळणा-या उत्पन्नाचा वाटा केवळ दोन टक्के आहे. बहुतेक कृषी उत्पादने स्थानिक बाजारपेठेतच खपतात.युरोपात निर्यात करण्यातही आघाडीवर आहे.कृषी क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्याला जगात तोड नाही.हे तंत्रज्ञान जगाला विकण्यावर या देशाचा आता भर आहे. तंत्रज्ञान व नावीन्य यांचा ध्यास इस्रायलच्या शेती क्षेत्रात पदोपदी जाणवतो. पाण्याची कमतरता आणि शेतीला योग्य नसलेली रेताड जमीन या संकटांशी झुंज देत येथे समृद्धीचे मळे फुलले आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर काटेकोर शेती आणि प्लॅस्टिकल्चरचा वापर करून इस्रायल जागतिक यशोगाथा बनला आहे. इस्रायलमध्ये अत्युच्च तंत्रज्ञान उपलब्ध आहे.इस्रायलची दूध उत्पादकता जगात सर्वोच्च आहे. येथील गाय एका वेतामागे 11 हजार लिटर दूध देते.इस्रायलमधील पोल्ट्री उद्योग आज जगात सर्वोत्तम आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरायचा, याचा धडा इस्रायलने जगाला दिला. शिवाय मत्स्योत्पादनातही या देशाने कमाल करून दाखवली आहे.समुद्राचे खारे पाणी वळवून ‘केजफिश फार्मिंग’ अत्यंत यशस्वी केले.इस्रायलसारख्या चिमुकल्या देशाने संपूर्ण जगाला सूक्ष्म सिंचनाचे वरदान दिले.इस्रायलच्या शेतकऱ्यांनी मधमाशापालन व भुंग्यांचे पालन करून कृषिक्रांती घडवत शाश्वत विकास प्रत्यक्षात आणून दाखवला आहे.नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव असूनही कृषीत केलेल्या प्रगतीमुळे इस्रायलला आज जगात मानाचे आहे.इस्त्रायलचे क्षेत्रफळ २२ हजार स्क्वेअर किलोमीटर.एक बिलियन डॉलर युरोपात भाजीपाला, फळे, फुले यांच्या निर्यातीतून मिळतात. इस्रायलचे कृषिक्रांतीबद्दल जगभर कौतुक होते. इस्त्रायल जे करू शकतो ते भारतासारख्या कृषिप्रधान देशाला सहज शक्य आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: