क्रिकेट: 7 नो बॉल आणि 30 धावा. पुन्हा तीच अवस्था.

श्रीलंकेकडून भारताचा दारून पराभव. संपूर्ण सामन्यात नो बॉलची चर्चा...

updated:2023-01-06 09:34:07

...

IND vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा आंतरराष्ट्रीय T-20 सामना पार पडला. यात भारताचा श्रीलंकेकडून दारून पराभव करण्यात आला. हार्दिक पंड्या कर्णधार असलेल्या भारतीय संघाने चक्क 7 नो बॉल टाकले. एकाच सामन्यात एवढे नो बॉल टाकणे हा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. प्रथम फलंदाजी करत असताना श्रीलंकेने 206 धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेकडून शनाकाने 22 चेंडूत सर्वाधिक 56 नाबाद धावा केल्या तर शनाका, रजिता व मादुशंका यांनी प्रत्येकी 2 2 विकेट घेतल्या. 

त्या बदल्यात भारताने 190 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने 31 चेंडूत सर्वाधिक 65 धावा केल्या तर उमरान मलिकने 3 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे संपूर्ण सामन्यात 7 नो बॉल टाकले गेले आणि श्रीलंकेने फ्री हिट चा पुरेपूर फायदा घेत 30 धावा जास्त केल्या. याचाच फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. तीन T-20 सामने असलेल्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आता अतितटीचा म्हणावा लागणारा असा सामना 7 जानेवारीला गुजरात येथे होणार आहे.

Popular

Technology: