पर्यटन: तीर्थक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

updated:2023-01-05 16:18:32

...

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.  भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते.१९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते.तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते  या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते  भीमा नदीची लांबी सुमारे ८६७ किमी एवढी भरते भीमरथी ही या नावानेही तिला ओळखले जाते. पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो. आल्दादायक स्वच्छ वातावरणामुळे एकदा तरी आवश्यक भेट देण्याचे हे ठिकाण आहे.

Popular

Technology: